श्री गणेशाय नमः
आज शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023
मिती वैशाख मासे शुक्ल पक्षे 8 शालिवाहन शके 1945 शोभन नाम सवंत्सरे
चंद्र कर्क राशीतून भ्रमण करेल
आजचे ग्रहमान
रवि बुध गुरु राहू हर्षल – मेष राशीत
शुक्र वृषभेत मंगळ मिथुनेत केतू तुळेत
शनि कुंभ राशीत या सर्व ग्रहांचा विचार करून आपण आजचे भविष्य जाणून घेऊ या
मेष रास
सकाळी 9. 53 पर्यंत दिवस चांगला आहे नंतर
व्यवहार सावधतेने करा
फसवणुकीची शक्यता कौटुंबिक सुख उत्तम राहील कामाचे कौतूक होईल
भाग्य 84%
वृषभ रास
प्रवासाचा योग आहे रद्द कराल विनाकारण त्रास सहन करावा लागेल खर्च तोलूनमापून करणार
भाग्य 63%
मिथुन रास
सकाळी कामे वेगाने होतील दुपारी आरामात हसतखेळत वेळ जाईल
उजवा डोळा चुरचुर करेल
भाग्य 65%
कर्क रास
उत्साहपूर्ण दिवस राहील जोडीदाराला तुमचे म्हणणे पटेल मुलांकडे दुर्लक्ष करा भावांच्या वादात पडू नका
भाग्य 90%
सिंह रास
चंद्र अनुकूल नाही व्यर्थ धावपळ करू नका नोकरचाकरांवर कडक नजर ठेवा वरिष्ठ स्तुती करतील पण त्यात फारसे तथ्य नाही
भाग्य 55%
कन्या रास
चंद्र अनुकूल आहे प्रेमिकांना प्रेमात यश मिळेल विवाह जुळतील
विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल
भाग्य 87%
तुळ रास
चंद्र अनुकूल आहे ठरवाल ते होईल कामे झपाट्याने होतील मोठी जबाबदारी वरिष्ठ तुम्हाला देतील कोर्टातील निर्णय तुमच्याबाजूने राहील
भाग्य 90%
वृश्चिक रास
चंद्र भाग्यात असल्याने समोरचे चुकतात तरी आपणांस शांत बसावे लागेल मनाला अंकुश लावा लागेल जोडीदाराला मदत कराल भावंडाशी वाद होतील
भाग्य 86%
धनु रास
चंद्र प्रतिकूल आहे बुध गुरु युती तुम्हाला मानसन्मान देईल जोडीदाराशी तात्पुरते वाद होतील
भाग्य 59%
मकर रास
जोडीदाराबरोबर फिरायला जाल आईशी मोकळेपणाने बोलाल दिवस मजेत जाईल
भाग्य 84%
कुंभ रास
चंद्र अनुकूल नाही आनंदाच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका हितशत्रूंना ठेचा भावंडांचे सुख उत्तम
भाग्य 61%
मीन रास
साडेसाती चालू आहे शनि मंगळ शुभ योगात असल्याने बढतीचे योग आहेत आज चंद्र अनुकूल आहे मनासारख्या घटना घडतील
भाग्य 90%
श्री शरद कुलकर्णी
(ज्योतिष अलंकार )
चिंचवडगाव पुणे
9689743507