“स्वच्छ सुंदर व हरित देहूरोड”
”स्वच्छ सुंदर व हरित देहूरोड ”असे ब्रीदवाक्य घेऊन देहूरोड व आजूबाजच्या परिसरातील नामवंत व प्रतिष्ठित नागरिकांनी आपल्या देहूरोड साठी सफाई अभियानास जुन्या मुंबई पुणे रोड वरील जकात नाक्यापासून सुरुवात केली. मान्सून सुरू होण्याच्या अगोदर रस्त्याच्या दुतर्फा ही साफसफाई पूर्ण करण्याचा संकल्प यावेळेस करण्यात आला, प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते आठ या वेळेत हे अभियान चालणार आहे. तसेच या अभियाांतर्गत देहूरोड हरित करण्यासाठी वृक्षारोपण व इतर गोष्टी सुद्धा करण्यात येणार आहेत.
यावेळी मेजर विनीत, कर्नल चौधरी आणि 29FAD चे जवान, OFDR चे GM Mr संजीव गुप्ता, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ चे पि.चि. चे संघचालक विनोद बन्सल, भास्कर रिकामे, सावरकर मंडळ आणि निसर्ग मंडळ ची टीम,, कॅन्टोन्मेंट बोर्ड देहुरोड चे प्रशासक अड. कैलाश पानसरे व सफाई कर्मचारी, सागर नझरकर पर्यावरण मित्र, वेद गुप्ता तसेच देहूरोड डॉक्टर्स असोसिएशन चे अध्यक्ष डॉ महेश कुदळे, डॉ रमेश बंसल, डॉ श्रीनिवास बंसल, डॉ विजय चौधरी, डॉ राजेंद्र चावत, डॉ जयेश कदम, डॉ सुभाष जाधवर, डॉ प्रकाश जाधवर, डॉ किशोर नाईकरे, डॉ मंजुषा सावंत, ॲड सावंत यांनी श्रमदान केले ..
धरणे धरणारे खेळाडू भारताची प्रतिमा डागाळत आहेत: पी.टी. उषा. भारतीय ऑलिम्पिक संघ अध्यक्ष.
येणाऱ्या रविवारी सकाळी सहा ते आठ OFDR गेट क्रमांक एक (पेट्रोल पंप जवळ) येथून श्रमदान करण्यासाठी सुरुवात करायची आहे तरी इच्छूक स्वयं सेवकांनी योगदान द्यावे असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले.