प्रतिनिधी : देहूरोड
पिंपरी चिंचवड मध्ये रेड झोनचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. २०१३ साली देहूरोड आयुध निर्माण फॅक्टरी पासून १८०० मीटर पर्यंतच्या काही गावांमध्ये रेड झोन लादण्यात आले होते. मात्र त्या वेळी ते गाव विकसित न्हवते. या पैकी सर्वात चर्चेत असलेले गाव म्हणजे रावेत आणि किवळे.
Advertisement
२०१३ साली रक्षा मंत्रालयाकडून जाहीर केलेला नकाशा पाहिला, तर आज त्यापैकी बऱ्याच भागात रहीवसी राहत आहेत आणि या सर्व अधिकृत बांधकाम आहेत, तसेच पिंपरी चिंचवड महानगपालिकेने या बांधकामांना परवानगी दिली आहे.
२०१६ च्या सर्क्युलर मध्ये रेड झोनची हद्द १०० मीटर असणार व ४०० मीटर पर्यंतच्या हद्दीत बांधकाम ४ मजल्यापर्यंत करता येईल असे रक्षा मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. परंतु नव्याने कोणताही नकाशा आजपर्यंत जाहीर करण्यात आलेला नाही यामुळे नागरिकांना मध्ये संभ्रम निर्माण झालेले आहे.
तर रक्षा मंत्रालयाकडून नवीन सुधारित नकाशा मागवून पिंपरी चिंचवड महानरपालिकेने नागरिकांसाठी रेड झोनचा सुधारित नकाशा जाहीर करावा अशी नागरिकांची मागणी आहे.
Advertisement