लखनऊ सुपर जायंट्सनचे पंजाबसमोर 258 धावांचे आव्हान
आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्ससमोर 258 धावांचे आव्हान ठेवले आहे. लखनऊकडून कायले मेयर्सने 54 तर मार्कस स्टॉयनिसने 72 आणि निकोलस पूरनने 45 धावा केल्या. पंजाबकडून कगिसो रबाडाने 2 विकेट घेतल्या. या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, आयपीएलच्या इतिहासातील हा दुसरा सर्वोच्च स्कोर आहे.