विजयानंतर द्वितीय स्थान लखनऊ ने राखीव केले.
IPL मध्ये काल झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्सवर 56 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 20 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून 257 धावांचा डोंगर उभा केला होता. या धावांचा पाठलाग करताना पंजाबचा संघ 19.5 ओव्हरमध्ये सर्व गडी गमावून 201 धावाच करु शकला. या दणदणीत विजयानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर होऊन चौथ्या स्थानावर असलेला लखनऊ संघाने थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.