नऊ लाखांच्या दारुवर फिरवला रोलर, यवतमाळ मधील शिरपूर मधला प्रसंग.
यवतमाळच्या वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्यात देशी-विदेशी अश्या 16 हजार 440 दारूच्या बाटल्यांवर रोलर फिरवण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने ही 9 लाख 60 हजारांची दारू नष्ट करण्यात आली आहे. वणी तालुक्याचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, यांनी उत्पादन शुल्क विभाग यांच्या समक्ष नष्ट करण्याची परवानगी दिली होती. दारूबंदीच्या 178 गुन्ह्यात ही देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली होती.