१० जणांना मृत्यू,मराठवाड्यात अवकाळी पावसाचा हाहाकार.
महाराष्ट्रावर ओढवलेले अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट अजूनही संपलेले नाही. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. या पावसामुळं मराठवाड्यात 3 दिवसात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अवकाळी पावसामुळं मराठवाड्यातील 153 गावांना फटका बसला आहे. बाधित झालेल्या 153 गावांमध्ये जालन्यातील 101, हिंगोलीतील 38 गावांचा समावेश आहे.