साधूंच्या हत्येप्रकरणी CBI चौकशी होणार.
दोन साधू व त्यांच्या ड्रायव्हरच्या पालघरमध्ये झालेल्या हत्येप्रकरणी सीबीआय चौकशी केली जाणार आहे हे नक्की झाले आहे.याप्रकरणात सीबीआयकडे संपूर्ण माहिती सोपवल्याची जबाबदारी राज्य सरकारला काल सुप्रीम कोर्टाने दिली. 2020 मध्ये मुले चोरणारी टोळी समजून जमावाने साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरवर हल्ला केला होता. तसेच त्यांना कारमधून बाहेर काढत बेदम मारहाण केली होती. यात साधूंचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील काही आरोपी सध्या जामिनावर बाहेर फिरत आहेत अशी माहिती राज्यशासनाने दिली.