चोरीला गेलेल्या १६४ दूचाकी पुणे पोलिसांनी शोधून काढल्या.
पुणे शहर परिसरात दुचाकी चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली होती. त्यात ५४ लाखांपेक्षा अधिक किंमतीच्या १६४ दुचाकी पोलिसांनी सापडून काढल्या आहेत. तसेच काही दुचाकी चोरांना अटक केल्याची माहिती आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना दुचाकी चोरट्यांना पकडण्याचा आदेश दिला होता. दुचाकी चोरट्यांविरोधातील ही मोठी कारवाई मानली जात आहे.