पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग.
पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे विद्यापीठाच्या जुन्या इमारतीला ही आग लागली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीची माहिती समजल्यानंतर अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.