कोरेगाव भीमा येथील चौदा वर्षांची विद्यार्थीनी गरोदर !
पुण्यात मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. येथील शिरूर तालुक्यात कोरेगाव भीमा येथे सहावीत शिकणारी 14 वर्षाची विद्यार्थीनी गरोदर असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पोटात दुखत असल्याने तिला उपचारासाठी गावातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी ही बाब समोर आली. त्यानंतर पीडितेला विश्वासात घेऊन विचारणा केली असता शेजारील मुलाने अत्याचार केल्याचे उघड झाले.