अदानी प्रकरणी सेबीने मागितला वेळ
अदानी-हिंडनबर्ग प्रकरणात पूर्ण चौकशी करण्यासाठी सेबीला आणखी 6 महिन्यांचा वेळ हवा आहे. तशी विनंती सेबीने सुप्रीम कोर्टाला केली आहे. शनिवारी कोर्टात आपली बाजू मांडताना हे प्रकरण खूप क्लिष्ट असून याची गांभीर्याने चौकशी करण्यासाठी जवळपास 15 महिने लागतील, असे सेबीने म्हटले. कोर्टाने या प्रकरणी तज्ञांची समिती नेमली आहे. हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानींच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती.