श्री गणेशाय नमः
आज रविवार दिनांक 30 एप्रिल 2023
मिती वैशाख मासे शुक्ल पक्षे 10 शालिवाहन शके 1945 शोभन नाम सवंत्सर
या सप्ताहातील ग्रहमान
चंद्र सिंह कन्या तुळ राशीतून भ्रमण करेल
शुक्र 2मे ला मिथुन राशीत जाईल
रवि बुध गुरु राहू हर्षल – मेष राशीत
शुक्र वृषभ मिथुन
मंगळ मिथुनेत केतू तुळेत
शनि कुंभ राशीत या सर्व ग्रहांचा विचार करून आपण सर्व राशींचे या आठवड्यातील भविष्य जाणून घेऊ या
मेष रास
रविवार व सोमवार उत्साहात जातील नियोजन पूर्वक सहलीचे आयोजन कराल मंगळवार बुधवार गुरुवार आरोग्याची काळजी घ्या भेटीगाठी घ्याल जेष्ट्यांचे आशीर्वाद मिळवाल गुरु शुक्र शनिवार घरच्या साठी वेळ द्याल
वृषभ रास
राशिस्वामी 2 तारखेपासून मंगलयुक्त आहे रवि सोम मंगळ उत्तम जातील घरच्यांना बराच वेळ देऊ शकाल बुधवार गुरुवारी चांगल्या जॉबच्या संधी येतील शुक्रवार शनिवार तटस्थ राहाल
मिथुन रास
रवि सोम मंगळवार आवडत्या ठिकाणी प्रवास कराल शुक्र मंगळ युती लाभदायी ठरेल बुधवार व गुरुवार आर्थिक लाभाचे शुक्रवार शनिवार करमणुकीचे ठरतील
कर्क रास
रविवार सोमवार आनंदात जातील मंगळवार बुधवारी आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहतील गुरुवार शुक्रवार शनिवार उत्साहात जातील
सिंह रास
रविवार सोमवार मजेत जातील मंगळवारी बुधवारी मनस्ताप वाढवणाऱ्या घटना घडतील गुरूवार उत्साहवर्धक राहील शुक्रवार शनिवार प्रवास कराल
कन्या रास
रविवार सोमवार खर्चिक दिवस राहतील मंगळवार बुधवार गुरुवार यशस्वी दिवस शुक्रवार शनिवार वाद टाळावेत.
तुळ रास
रविवार सोमवार लाभाचे दिवस आहेत मित्रांच्या गाठभेटी होतील मंगळवार बुधवार वस्तू हरवण्याची शक्यता गुरुवार शुक्रवार शनिवार पाहुण्याची वर्दळ राहील
वृश्चिक रास
रविवार सोमवार तुम्ही सांगाल तसे सर्व वागतील मंगळवार बुधवार गुरुवार धनप्राप्ती उत्तम राहील महत्वाची वस्तू खरेदी कराल शुक्रवार शनिवार डोक्याला ताप करून घेऊ नका जबाबदारी झटका
धनु रास
रविवार सोमवार निसर्गाच्या सानिध्यात राहाल मंगळवार बुधवार गुरुवार उत्साहाचे दिवस
शुक्रवार शनिवार तब्येतीला जपा
मकर रास
रविवार सोमवार आपण आराम कराल प्रवास रद्द करणार मंगळ बुध गुरु कार्यक्रमात भाग घ्याल ज्येष्ठांचा आदर कराल शुक्रवार शनिवार जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडाल
कुंभ रास
रविवार सोमवार जोडीदारासोबत निसर्गसानिध्यात असाल मंगळवार बुध गुरूवारी मूड ठिक राहणार नाही शुक्रवार शनिवार ऐतिहासिक जागी जाल
मीन रास
रविवार सोमवार मानसिकता ठिक नसेल आराम घेवा वाटेल पण प्रवास करावा लागेल मंगळवार बुध गुरूवारी घराचे वातावरण छान असेल शुक्रवार शनिवार उत्साहवर्धक दिवस
श्री शरद कुलकर्णी
9689743507
ज्योतिष अलंकार
चिंचवडगाव पुणे