पिंपरी चिंचवड मध्ये अजुन ही कोयत्याची दहशत.
पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. पिंपरीत काही तरुणांनी मेडिकलवर पाण्याची बाटली विकत घेतली. पण पैसे न देताच ते निघून चालले होते. यावेळी मेडिकल चालकाने पैसे मागितले असता त्यांनी हातात कोयता घेऊन मेडिकलची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. यात मेडिकलमध्ये काम करणारा कामगार जखमी झाला आहे. या घटनेनंतर मेडिकल चालकाने पिंपरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.