शालेय मुलांना सुट्टी साठी PMPML ची मोठी परवणी.काय आहे खास जाणून घ्या.
मुलांनच्या शाळांना सुट्ट्या सुरू झाल्यानंतर पालकांना वेद लागतात की आता आपण वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना,पर्यटन स्थळांना जाऊन भेट द्यावी आणि मुलांना आपल्या इतिहासाबद्दल, सामाजिक घटकांनबद्दलची ओळख करून द्यावी. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरांमध्ये पीएमपीएम एल आसपासच्या धार्मिक व पर्यटन स्थळांसाठी १ मे पासून खास जास्तीची वातानुकूलित बस सेवा सादर करीत आहे.सदर बस सेवा शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवशी सुद्धा चालू राहणार असुन, जर आपला ३३ जणांचा गट असेल तर आपण सामूहिक बुकिंग करता येऊ शकते. त्याच बरोबरेने पाच तिकिटांवर शंभर टक्के सूट मिळवू शकते असे कळविण्यात आले आहे .सदर बस सेवा डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज ,हडपसर गाडीतळ ,भोसरी बस स्थानक, निगडी ,मनपा भवन येथून सुटणार असून सदरचे पास देखील येथे मिळणार आहेत.वैशिष्ट्य म्हणजे ज्या दिवशीचे आपण बुकिंग करणार आहात त्या दिवशी तुम्हाला घरापासून ते घरापर्यंत ची बस सेवा मोफत मिळणार आहे ही या सेवेतील खास वैशिष्ट्य असून प्रत्येक बस मध्ये एक मार्गदर्शक असणार आहे हा मार्गदर्शक आपल्याला विविध स्थळांची माहिती देणार आहेत. तरी परिवहन मंडळाने सर्व पिंपरी चिंचवड व पुणे शहरवासीयांना आपण या सेवेचा आनंद घ्यावा याच्यासाठी आवाहन केले आहे.