३१७ ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उद्यापासून
महाराष्ट्र दिन उद्या ( 1 मे) आहे. त्यानिमित्त राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून तब्बल 317 ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत या दवाखान्यांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. आजपर्यंत सात लाखाहून अधिक रुग्णांची या दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले.