‘मोदींनी सांगितल्यास राजीनामा देणार’
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा जे. पी. नड्डा यांनी सांगितल्यास तत्काळ राजीनामा देणार, असे स्पष्ट केले आहे. कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. कुस्तीपटूंचे दिल्लीत आंदोलन सुरु आहे. दरम्यान याआधी राजीनामा देणे म्हणजे आरोप स्वीकार करणे, असे विधान बृजभूषण यांनी केले होते.