सावधानतेचा इशारा,सिंहगडाजवळ दिसला गवा !!
पुणे- सिंहगडाला लागून असलेल्या मनेरवाडी (ता. हवेली) गावच्या हद्दीत गव्याचे दर्शन झाले आहे. येथे प्राथमिक बचाव पथकाचे जवान खडा पहारा देत आहेत. वन विभागाच्या पथकासह रेस्क्यु टीमही येथे दाखल झाल्याचे समजते. शेतकरी, नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच विनाकारण गवा भेदरून काही विपरीत घटना घडेल असे कृत्य करु नये, असे आवाहन वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांनी केले.