मोबाईलवर स्पॅम कॉल बंद
आजपासून मोबाइलवर अनवॉन्टेड कॉल व मेसेज येणार नाहीत. देशातील जियो, एअरटेल व व्होडाफोन-आयडिया या प्रमुख कंपन्यांनी स्पॅम कॉल रोखण्यासाठी त्यांच्या सिस्टिममध्ये फिल्टर लावले आहे. ‘एआय’च्या मदतीने स्पॅम मेसेज आणि कॉल्स नेटवर्कवरच ब्लॉक होतील, असा कंपन्यांचा दावा आहे. दरम्यान, ट्रायने कंपन्यांना 30 एप्रिलची मुदत दिली होती. कंपन्यांची चाचणी यशस्वी ठरल्याचे समोर आले आहे.