एप्रिलमध्ये एकूण किती कोटी जीएसटीचे संकलन ?
एप्रिल 2023 मधील GST संकलनाच्या आकडेवारीने इतिहास रचला आहे. एप्रिलमध्ये जीएसटी संकलन 1.87 लाख कोटी रुपये झाले आहे. आतापर्यंतचा हा ऐतिहासिक विक्रम आहे. आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये एकूण 1,87,035 कोटींच्या GST संकलनात CGST संकलन 38440 कोटी रुपये, SGST संकलन 47412 कोटी रुपये, IGST 89158 कोटी रुपये आणि उपकर म्हणून 12025 कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्यात आले आहेत.