श्री गणेशाय नमः
आज मंगळवार दिनांक 2 मे 2023
मिती वैशाख मासे शुक्ल पक्षे 12 शालिवाहन शके 1945 शोभन नाम सवंत्सरे
दिन विशेष उत्तम दिवस
चंद्र कन्या राशीतून भ्रमण करेल
आजचे ग्रहमान
रवि बुध गुरु राहू हर्षल – मेष राशीत
शुक्र वृषभेत /मिथुनेत मंगळ मिथुनेत केतू तुळेत
शनि कुंभ राशीत या सर्व ग्रहांचा विचार करून आपण आजचे भविष्य जाणून घेऊ या
मेष रास
आज प्रकृतीची तक्रार राहील दुपारनंतर उत्साह वाढेल जोडीदाराची साथ उत्तम मिळेल मुलांची प्रगती अभिमानास्पद राहील
भाग्य 74%
वृषभ रास
कुटुंबाला आज पूर्ण दिवस द्याल आईची तब्येतीत सुधारणा राहील
भावंडाना आर्थिक लाभ होईल
भाग्य 68%
मिथुन रास
दूरच्या प्रवासाचा बेत आखाल तणावमुक्त दिवस राहील महत्वाचे कामे 3 नंतर होतील
भाग्य 65%
कर्क रास
धनप्राप्तीचा दिवस राहील मानसिक स्थिती 10 वाजेपर्यंत त्रासदायक राहील नंतरचा दिवस फार उत्तम जाईल
भाग्य 62%
सिंह रास
चंद्र रवि गुरु शुक्र शनि बलवान आहेत मनासारखा दिवस राहील
मुलांकडून समाधान मिळेल
भाग्य 82%
कन्या रास
चंद्र अनुकूल नाही मनाविरुद्व घटना घडतील
आत्याकडून शुभ वार्ता मिळेल गुंतवणूक योग्य ठिकाणी करा
भाग्य 53%
तुळ रास
राशिस्वामी आज 2नंतर बदलतो त्यामुळे तुमचे भाग्यातील अडथळे दूर होतील जोडीदाराशी संबंध अजून चांगले होतील
भाग्य 58%
वृश्चिक रास
आजचा दिवस लाभदायी ठरेल महत्वाचे काम आज होईल संतान बद्दल विशेष कौतूक राहील
भाग्य 89%
धनु रास
कामाची जबाबदारी वेळेत पार पडाल मुलाकडून शुभ समाचार मिळेल जोडीदाराबद्दल आदर वाढेल
भाग्य 86%
मकर रास
घटना अनुकूल होण्यास सुरुवात होईल मुलाबद्दल काळजी वाटेल ऐतेहासिक ठिकाणी भेट द्याल
भाग्य 78%
कुंभ रास
प्रवास शक्यतो टाळा अचानक धनलाभ शेयर मध्ये फायदा राहील वाहनात बिघाड होईल
भाग्य 56%
मीन रास
जोडीदाराशी छान मेतकूट जमेल वेळीच सर्व गोष्टी होतील आराम उत्तम झाल्याने दिवसभर उत्साहित राहाल
भाग्य 80%
श्री.शरद कुलकर्णी
(ज्योतिष अलंकार)
चिंचवड, पुणे,
संपर्क 9689743507