बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी एक रुपया शुल्क,प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन निर्मितीचा संकल्प ,कामगार मंत्री श्री सुरेश खाडे .
कामगारांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमचे सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ESIC हॉस्पिटल उभारण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे अशी माहिती काल आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिली.
काल रामकृष्ण मोरे सभागृह पिंपरी चिंचवड येथे कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि अप्पर कल्याणकारी मंडळ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की या कामगार भवनात कामगार विभागाशी संबंधित सर्व कार्यालये एकाच ठिकाणी असतील.तसेच बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी पंचवीस रुपये ऐवजी आता नाममात्र एक रुपया शुल्क आकारण्याचा निर्णयही सरकारने घेतला असल्याचे सांगितले.
यावेळी श्री खाडे यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अर्धवेळ कामगारांच्या वेतनात १हजार प्रतिमाह वाढ केल्याचे जाहीर केले.
भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत कामगार चळवळ उभारली.
कामाचे आठ तास,रविवार सुट्टी,कामगार किमान वय,या मागण्यासाठी कामगारांत जागृती केली.
जागतिक कामगार चळवळीत आपल्याही कामगारांचा सहभाग होता.कामगार हा उद्योग क्षेत्राचा कणा असल्याने त्यांच्या परिश्रमाने उद्योग क्षेत्राची भरभराट होत असते.
कार्यक्रमात यावेळी गुणवंत कामगारांचा व कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनाचा लाभ मिळालेले कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार यावेळी करण्यात आला.तसेच २०२१-२२ यावर्षीचे कामगार भूषण आणि गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर करण्यात आले यामध्ये कामगार भूषण मोहन गायकवाड(टाटा मोटर्स) गुणवंत कामगार सदाशिव एकसंबे (कमिन्स इंडिया कोथरूड पुणे),परेश पारेख(भारतीय आयुर्विमा बिबवेवाडी पुणे)श्रीकांत कदम,संदीप पोलकम(टाटा मोटर्स पिंपरी)प्रवीण वाघमारे(हाफकिन पिंपरी) प्रकाश कवडे (सकाळ पुणे)यांचा समावेश आहे.