ब्रेकिंग न्यूज – मी अध्यक्षपदावरून निवृत्त होणार शरद पवार.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे. मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार, असे आज पवार यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतल्या ‘लोक माझे सांगाती’ या पवार यांच्या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे.. तसेच आपण यापुढे निवडणूक लढवणार नाही, राष्ट्रवादीचा नवीन अध्यक्ष आता पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील, असेही ते म्हणाले.