निघोजे महाळुंगे रोडवर कंटेनर चालकाला मारहाण
दोघांना अटक
कंटेनर चालक रामअधीन भिलमन(वय ३३.उ.प्र) यादव हा त्याच्या कंटेनरमधे स्क्वॉडा कंपनीच्या गाड्या घेऊन जात होता यावेळी आरोपी अविनाश सुरेश मोरे(रा.खेड) व त्याचा साथीदार अजय तुळशीराम गवळी
(रां.निघोजे) यांनी त्याची गाडी कंटेनर समोर आडवी घातली. कंटेनर चालकाला गाडी बाहेर काढत त्याला मारहाण केली व त्याच्या खिशातून ८०० रुपये काढून घेतले मारहाण का केली असे विचारले असता कंटेनरच्या काचा दगडाने थोडं गाडीचे नुकसान केले. रामअधीन यांनी पोलिसात फिर्याद दिली असून महाळुंगे पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.