मुंबई-ठाणे- पुणे मार्गावर धावणार इलेक्ट्रिक शिवनेरी बस
ऑलेक्ट्रा ग्रिनटेकने इलेक्ट्रिक उर्जेवर धावणारी , आवाजरहित, प्रदूषणरहित इंटरसिटी ई-शिवनेरी बस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (MSRTC) महामंडळाला सुपुर्द केली आहे.१ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातील पहिल्या ई-शिवनेरी बसचे लोकार्पण करण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण आणि इंधन बचत हे उद्दिष्ट समोर ठेवून महाराष्ट्र राज्याने मुंबई ठाणे दरम्यान इंटरसिटी इलेक्ट्रिक बसेस प्रवासी सेवेत आणल्या आहेत.
ई-शिवनेरी बसची वैशिष्ट्ये
नव्याने दाखल झालेल्या ई-शिवनेरी बसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये ABS सह डिस्क ब्रेक, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, रिअल टाइम ट्रॅकिंग सिस्टिम, सामानासाठी जागा, युएसबी कनेक्शनसह , सीट बेल्ट असलेली पुश बॅक सीट आणि Advance वाहन व्यवस्थापन प्रणाली असे फीचर्स या बसमध्ये मिळणार आहेत.तसेच बस एकदा चार्ज केली की तब्बल २५० किमी इतका प्रवास करू शकते.
या बसमुळे प्रवाशांना आरामदायी आणि आवज विरहित प्रवास उपलब्ध होणार आहे.