राहुल गांधींनचा निकाल हायकोर्टाने ठेवला राखून.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनाव प्रकरणी अंतरिम दिलासा देण्यास गुजरात हायकोर्टाने आज नकार दिला आहे. कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. याप्रकरणावर न्यायमूर्ती हेमंत प्रचाक यांच्या सुट्टीनंतर निकाल येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत राहुल गांधींना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. 2019 च्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्यासाठी गांधींनी याचिका दाखल केलेली आहे.