राज्यात आजपासून शुन्य सावली दिवस अनुभवता येईल
राज्यातील काही भागात आजपासून 31 मे पर्यंत शुन्य सावली दिवस लोकांना अनुभवता येणार आहे. तुम्हाला यासाठी दुपारी 12 ते 12.35 या वेळेमध्ये मोकळ्या जागी जाऊन उभे राहावे लागेल. सुर्य डोक्यावर असल्याने सावली दिसत नाही. यालाच शुन्य सावली दिवस म्हणतात. सावंतवाडीत 3 मे रोजी तर धुळे जिल्ह्यात 31 मे रोजी शुन्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. तसेच मुंबईत 5 मे पासून 28 जुलैपर्यंत ही अनुभूती घेता येईल.