अनलॉक जिंदगी’चा सुपरहिट विश्व विक्रम
अवघ्या जगाला संकटात टाकणाऱ्या कोरोनाच्या महामारी काळात बॉलिवूडलाही चांगलाच फटका बसला होता.पण आता याच महामारीच्या भयाण वास्तवावर भाष्य करणाऱ्या ‘अनलॉक जिंदगी’ या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. या चित्रपटाचा रोमांचकारी ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. ट्रेलर पाहून या चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आता वाट पाहात आहेत.
चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक राजेश गुप्ता यांनी
‘आमच्या ‘अनलॉक जिंदगी’ या चित्रपटाची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड होणे ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असल्याचे सांगितले आहे.महामारी काळातील भयाण परिस्थितीवर भाष्य करणारा हा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला होता. हृदय पिळवटणारा हा भावनिक काळ होता. माणसाचे मतपरिवर्तन करणारी ही कथा असून हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना अनेक गोष्टी त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यातील घडल्या सारख्याच आहेत.
अनलॉक जिंदगी’ने आतापर्यंत शिकागो, टोरांटो, पिनॅकल, मेक्सिको, पॅरिस, न्यूयॉर्क, मिलान, लंडन आणि १३ व्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल आदी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नामांकने मिळवली असून मिलान फिल्म अवॉर्ड्समध्ये ‘बेस्ट नरेटिव्ह फिचर फिल्म’ पिनॅकल फिल्म अवॉर्ड्समध्ये ‘बेस्ट फिचर फिल्म’ या २ पुरस्काराने या चित्रपटाला सन्मानित करण्यात आले आहे.