अभिरुची संपन्न कला रसिक घडविण्याचे संस्कार भारतीचे ध्येय- श्री. रवींद्र देव.
नृत्य तरंग ला दुसऱ्या वर्षीही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीच्या नृत्यविधेने नृत्य तरंग हा कार्यक्रम रविवार दिनांक ३० एप्रिल रोजी आचार्यअत्रे रंग मंदिर, संत तुकाराम नगर पिंपरी येथे सायंकाळी पाच वासता पार पडला. आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध कथक नृत्यांगना आणि गुरु डॉ. माधुरी आपटे उपस्थित होत्या. मान्यवरांमध्ये संस्कार भारतीय केंद्रीय कार्यकारिणीतील माननीय श्री रवींद्र जी देव आणि पश्चिम प्रांत महामंत्री श्री सतीश जी कुलकर्णी उपस्थित होते. तसेच पश्चिम प्रांत उपाध्यक्ष सौ सुवर्णा बाग, पश्चिम प्रांत साहित्य विभाग संयोजिका सौ विशाखाताई कुलकर्णी, समिती अध्यक्ष श्री. सचिन काळभोर उपस्थित होते.यावेळी समितीच्या वतीने मान्यवरांचा भगवदगीता देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपरी चिंचवड समितीच्या सचिव सौ. लिनाताई आढाव यांनी केले.पिंपरी चिंचवड परिसरातील 14 नृत्य संस्था या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात कथक आणि भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यांबरोबरच लोकनृत्यही प्रस्तुत केले गेले.
सहभागी झालेल्या नृत्य संस्था आणि त्या संस्थांच्या संचालिका खालील प्रमाणे –
१.नृत्यशारदा कथक कलामंदिर – सौ. स्नेहल सोमण,
२.नृत्यार्पण स्कूल ऑफ भरतनाट्यम – सायली देवधर
३.नटेश्वर कथक नृत्यकला मंदिर – सौ.शिल्पा भोमे,
४.कलाश्री नृत्यशाळा – सौ. सायली काणे
५.ओमकार भरतनाट्यम डान्स क्लासेस – सौ श्रुती परांजपे
६. वर्णीका नृत्यलय – सौ. भावना गौड,
७. नृत्योपासना – सौ. वरदा वैशंपायन,
८.नुपूर नृत्यालय – डॉ. सौ सुमेधा गाडेकर,
९. नटराज भरतनाट्यम अकॅडमी – सौ. वासंती निकम,
१०. नटेश्वर नृत्यलय – सौ प्रमोदिनी तपकिरे
११. नुपूर भरतनाट्यम डान्स अकॅडमी- सौ. सायली सोनवणे
१२.कलासाधना भरतनाट्यम अकॅडमी – सौ.सुवर्णा बाग,
१३. संचय कथक नृत्य अकॅडमी – कु. राजश्री धोंगडे,
१४. तपस्या सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यम – सौ संयोगिता पाटील
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपरी चिंचवड समितीच्या सहसचिव सौ. प्रणाली महाशब्दे आणि जाई दामोदरे यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात संगीत विधेच्या सौ शर्मिला शिंदे, सौ सुधा लच्याण यांच्या ध्येय गीत गायनाने झाली. अक्षय बाबर यांनी तबल्यावर साथ दिली.
रांगोळी विधेच्या सहसंयोजक सौ. योगिनी शिंदे आणि संचिता सागवेकर तसेच सहकाऱ्यांनी रांगोळी रेखाटली होती.या सादरीकरणासाठी प्रकाश योजना श्री प्रसाद वैद्य आणि माधव जोगळेकर यांनी केली,फोटोग्राफी श्री सचिन राजर्षीव्हिडिओग्राफी चे काम श्री. केदार गोडबोले आणि श्री. प्रमोद ओझा यांनी केले.यासाठी सौ. सायली काणे यांचे सहकार्य लाभले.म्युझिक सिस्टीम आणि प्रकाश योजना व्यवस्थापन – श्री.प्रशांत काळोखे. सभागृह व्यवस्थापक श्री. प्रमोद लांडे यांनी काम पाहिले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बालविधा प्रमुख सौ शोभा पवार, नृत्य विधा सहप्रमुख स्वप्ना रत्नाळीकर, सौ. स्नेहल सोमण, श्री प्रफुल्ल भिष्णूरकर, कोषप्रमुख सौ.प्रचिती भिष्णूरकर, छाया ताई गायकवाड, रमेश खडबडे,श्रीकांतजी चौगुले, स्वप्नील शिंदे यांचा हातभार लागला. नृत्य गुरु आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमात रंगत आली.
कार्यक्रमाला पश्चिम प्रांत नृत्य विधा सहप्रमुख रश्मी म्हासवडे उपस्थित होत्या.नृत्य विधा प्रमुख सौ. वरदा वैशंपायन यांनी उपस्थितांचे,रसिक श्रोते व देणगीदारांचे आभार मानले.