भारतातला पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग हा सर्वात महागडा.
देशातील सर्वाधिक टोल मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आकारला जात आहे. देशातील सर्वाधिक मोठा असलेल्या यमुना एक्स्प्रेस वे पेक्षाही जास्त टोल या मार्गावर आकारला जातो. 2004 ला टोल सुरू करताना दर 3 वर्षांनी 18% दरवाढीचा निर्णय झाला होता. त्यानुसार 1 एप्रिल 2023 पासून दरवाढ झाली. त्यामुळे या मार्गावर 3.40 रुपये प्रतिकिलोमीटर टोल कारसाठी आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रतिकिलोमीटर 1.73 रुपये टोल कारसाठी आहे.