पेट्रोल पंपाची डीलरशीप देण्याचे आमिष दाखवून फसवणूक
चिंचवड,इंदिरानगर येथे पेट्रोल पंपाची डीलरशीप (Chinchwad) देण्याच्या बहाण्याने उमेश महालिंग स्वामी (वय 38, रा. इंदिरानगर, चिंचवड) यांची तब्बल
1 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.18 ते 28 मार्च या कालावधीत इंदिरानगर चिंचवड येथेहा प्रकार घडला.याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार www.petrolpumpksk.com वेबसाईट धारक अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीने फिर्यादी यांना पेट्रोल पंपाची डीलरशीप देण्याचे आमिष दाखवले. एक वेबसाईट बनवून टी सरकारी वेबसाईट असल्याचे हुबेहूब भासवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांना क्यू आर कोड स्कॅन करायला लाऊन त्याआधारे फिर्यादी यांच्या बँक खात्यातून एक लाख 75 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली.
चिंचवड पोलीस आधिक तपास करीत आहेत.