श्री गुरुदेव दत्त
आज गुरुवार दिनांक 4 मे 2023
मिती वैशाख मासे शुक्ल पक्षे 14 शालिवाहन शके 1945 शोभन नाम सवंत्सरे
दिन विशेष शुभ दिवस
श्री नृसिंह जयंती
चंद्र कन्या राशीत 9.20 पर्यंत नंतर तुलेत भ्रमण राहील
आजचे ग्रहमान
रवि बुध गुरु राहू हर्षल – मेष राशीत
शुक्र मिथुनेत मं गळ मिथुनेत केतू तुळेत
शनि कुंभ राशीत या सर्व ग्रहांचा विचार करून आपण आजचे भविष्य जाणून घेऊ या
मेष रास
आजचा दिवस 10नंतर उत्तम आहे तरुणांचे प्रेम विवाह होतील नवीन वस्तू खरेदी कराल जोडीदारासोबत मजेत दिवस जाईल
भाग्य 70%
वृषभ रास
शनीची उत्तम साथ तुम्हाला आहे स्पर्धा वक्तृत्व कला क्षेत्रात यश मिळवाल आरोग्याकडे दुर्लक्ष कराल
भाग्य 60%
मिथुन रास
तब्येतीला जपून काम करा मनोरंजनात वेळ जाईल मुलांचे अभ्यासात मन लागणार नाही
भाग्य 75%
कर्क रास
आजचा मेनू तुमच्या आवडीचा राहील घरात प्रसन्न वातावरण राहील आईबद्दल शुभ घटना घडतील
भाग्य 88%
सिंह रास
भावाकडून चांगल्या घटना समजतील सामाजिक पातळी वर चांगले काम तुमच्या हातून होतील वाहवा मिळवाल
भाग्य 72%
कन्या रास
पैसा येईल पण टेंशन वाढेल वादात जास्त
पडू नका अपमानित व्हावे लागेल
भाग्य 61%
तूळ रास
आज उत्साही राहाल तुमचा दरारा राहील घरीच राहणे पसंद कराल प्रवास टाळाल जोडीदाराशी उत्तम जमेल
भाग्य 84%
वृश्चिक रास
आरोग्यासाठी खर्च करावा लागेल मनाविरुद्ध काम मिळेल पण आपण जिद्दीने पूर्ण कराल
भाग्य 63%
धनु रास
लॉटरी लागण्याची शक्यता चांगल्या लोंकाचा सहवास लाभेल नवीन वास्तूचा विचार कराल
भाग्य 79%
मकर रास
आज दिवस आनंदात जाईल यशस्वी दिवस आहे नवीन ओळखी वाढतील लोक कौतुक करतील
भाग्य 80%
कुंभ रास
प्रवासाचा आनंद घ्याल निसर्गरम्य ठिकाणी जाल
मेव्हणेकडून सहकार्य मिळेल
भाग्य 68%
मीन रास
चंद्र प्रतिकूल आहे अडचणीत वाढ होईल पण याची कल्पना तुम्हाला अगोदर केल्यामुळे सगळ्यांना थक्क करून सोडाल
भाग्य 57%
श्री शरद कुलकर्णी(ज्योतिष अलंकार )
चिंचवडगाव पुणे
9689743507