घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्रास महापालिकेची मान्यता
घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्र आणि जैव वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येते.त्यासाठीच्या प्रक्रिया केंद्र उभारण्यास पर्यावरण विभागामार्फत महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.त्यासाठी होणारा खर्च आणि घरगुती घातक कचऱ्याची दोन ठिकाणी केंद्र उभारणीस ही मान्यता असेल.
महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक सिंह यांनी मंजुरी दिली. यामधे महापालिकेच्या क्रीडा विभागास आवश्यक विविध इनडोअर जिम साहित्य नमुन्याचे स्पेशिफिकेशन प्रमाणे तांत्रिक तपासणी अहवाला करीता सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाला मानधन देण्यात येणार आहे. तसेच, ३१ रस्त्यांवर खोदलेल्या चरांची व पदपथांची दुरुस्ती, आवश्यकतेनुसार रस्त्यांचे रुंदीकरण आणि स्थापत्य विषयक कामे केली जाणार आहेत,महापालिका मुख्य कार्यालय व इतर विविध कार्यालयातील संगणकीय केबल नेटवर्क आणि नविन कार्यालयांना इंटरनेट सेवा दिली जाणार आहे.मंजूर विषय- बोपखेल फाटा ते आळंदी रस्ता आणि देहू ते आळंदी रस्त्यावर खोदलेल्या चरांची व पदपथांची दुरुस्ती- एम्पायर इस्टेट सोसायटी परिसरातील सेवा रस्त्यांचा डांबरीकरण – प्रभाग आठमधील विविध उद्यानांची देखभाल- सामुदायिक व सार्वजनिक शौचालयाचॉ स्वच्छता व देखभाल दुरुस्ती- टेल्को रस्त्यावरील चर व पदपथांची दुरुस्ती, आवश्यकतेनुसार रुंदीकरण- तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी वेतनावर ११ महिने करारानुसार नेमणूक करणे- मुख्य रस्ते, महामार्ग, बीआरटी मार्ग, १८ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई-
आरोग्य विभागासाठी क्लॉथ बॅग व्हेंडिंगमशीन आणि अभिलेख रुमाल, रुग्णालयांतील रुग्ण व डॉक्टरांचे गणवेश खरेदी हे विषय यात समाविष्ट होते. मुख्य प्रशासकीय भवनात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप आदी उपस्थित होते.