पिंपरी चिंचवड येथे “हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना”
मा.मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने “हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” याचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पिंपरी चिंचवड च्या सावतामाळी मंदीर, चिखली घरकुल, प्राथमिक शाळा, जाधववाडी येथील हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा शुभारंभ मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मा. अतिरिक्त आयुक्त श्री. जितेंद्र वाघ, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, उप आयुक्त रविकिरण घोडके, माजी महापौर राहुल जाधव इत्यादी उपस्थित होते.