December 12, 2023
PC News24
जीवनशैलीनिवडणूकराजकारण

लोक माझे सांगाती पवारांचे ठाकरेंवर टीकास्त्र…

लोक माझे सांगाती पवारांचे ठाकरेंवर टीकास्त्र…

‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनामध्ये नाही, हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो’, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’मध्ये मांडून याबाबत सातत्याने टीका करणाऱ्या शिवसेनेच्या आरोपां मधील हवाच काढून टाकली आहे. या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीमध्ये पवार यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, तसेच त्यांच्या पक्षाच्या भूमिकांवर टीकास्त्र सोडले आहे.पुस्तकामध्ये नव्याने जोडण्यात आलेल्या प्रकरणातील अनेक गोष्टींची चर्चा सुरू झाली आहे. या पुस्तकात पवार यांनी शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांच्या मानसिकतेवर व त्यांच्या नेत्यांच्या कृतीवर थेट बोट ठेवले आहे.

याच पुस्तकातील ३१८व्या पानावर पवार यांनी शिवसेनेच्या कट्टर हिंदुत्ववादाचाही समाचार घेतला आहे. ‘महाविकास आघाडी आकाराला येताना शिवसेनेचा कट्टर हिंदुत्ववाद मारक ठरेल, अशी भीती काहींना होती. शिवसेनेच्या बाबतीत माझे मत ऐकाल तर, हा पक्ष वेळोवेळी कितीही जोरकसपणे भूमिका मांडो, त्यांचा वैचारिक पाया तितका भक्कम नाही. शिवसेनेच्या पूर्वेतिहासावर नजर टाकली तर राजकारणा साठी लागणारी लवचिकता त्यांनी वारंवार दाखविली आहे’, असे पवार यांनी नमूद केले आहे. आणीबाणीमध्ये शिवसेनेने इंदिरा गांधी यांना दिलेल्या पाठिंब्याची तसेच त्यानंतरच्या निवडणुकीमध्येही त्यांना पाठिंबा देऊन विधान परिषदेतील दोन आमदार पदे मिळविल्याच्या इतिहासाची पवार यांनी आठवण करून दिली आहे. ‘मुस्लिम व दलित विरोध हा शिवसेनेच्या भूमिकेतील एक पैलू झाला. परंतु तो दिसतो तेवढा टोकाचा नाही’, असे आमचे निरीक्षण होते’, असेही त्यांनी नमूद केले आहे. शिवसेना (ऊबाठा) यांची यावर अजूनही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पक्षाचे नेते संजय राऊत यांनी याबद्दल उद्धव ठाकरे सविस्तर बोलणार असल्याचे जाहीर केले. तर, ठाकरे काय भूमिका घेणार, यावरच आता महाविकास आघाडीची भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट होणार आहे.

शिवसेना नेतृत्व कमजोर

उद्धव ठाकरे यांच्या मर्यांदांचाही उल्लेख पवार यांनी केला आहे. ‘बाळासाहेबांसमवेतची संवादातील सहजता उद्धव यांच्याशी बोलताना नव्हती. मुख्यमंत्री असताना त्यांचे मंत्रालयात फक्त दोनदा जाणे आमच्या फारसे पचनी पडणारे नव्हते’, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्याच्या पुढच्या पानावर, ‘ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेतच वादळ माजेल याचा आम्हाला अंदाज नव्हता. हा असंतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेना नेतृत्व कमी पडले, असा निष्कर्ष पवार यांनी काढला असून संघर्ष न करता उद्धव यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला’, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Related posts

मनोज जरांगेंच्या दौऱ्यात अपघात! नक्की काय घडलंय ?

pcnews24

महाविकास आघाडीत नाराजीची ठिणगी!!

pcnews24

आजचे आपले राशीभविष्य !

pcnews24

गुगल लोकेशनच्या रिव्ह्यू टास्कद्वारे ऑनलाइन फसवणूक,तब्बल १२लाख ८५ हजाराला गंडा.

pcnews24

खंडणीची धमकी देणाऱ्यास पोलिसांकडून अटक, आमदार महेश लांडगे, काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे, मनसेचे नेते वसंत मोरे अशा राजकीय नेत्यांना केले होते टार्गेट.

pcnews24

ईद ए मिलाद निमित्त शुक्रवारी सुट्टी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय,सलग पाच दिवस शासकीय कामकाज बंद

pcnews24

Leave a Comment