शरद पवारांच्या आत्मचरित्रातील आरोपावर उध्दव ठाकरेंची सावध प्रतिक्रिया
शरद पवार म्हणाले होते “मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनामध्ये नाही हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो” यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले
“ मी माझ्या मतावर ठाम आहे, मी माझी मतं यापुढेही ठामपणे मांडतच राहणार, महाविकास आघाडीला माझ्याकडून तडा जाणार नाही याची काळजी मी घेईन. तसं मी काही बोलणार नाही किंवा करणार नाही”
उद्धव ठाकरेंनी फक्त दोन वेळा मंत्रालयात जाणं आपल्याला आवडलं नसल्याचा शरद पवारांनी केलेल्या दुसऱ्या टिप्पणी वर ठाकरे म्हणाले,
“प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार असतो. मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं हे जगजाहीर आहे. प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य वाटतो. यापलीकडे काही बोलणं योग्य नाही”