पुणे महापालिका आयुक्त – महाराष्ट्र दिनाला अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला अनुपस्थित राहीलेल्या पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पुणे मनपा आयुक्तांनी दिले आहेत. ध्वजारोहणासाठी पुणे मनपातील 2,500 कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र फक्त 200 कर्मचारी ध्वजारोहणासाठी उपस्थित राहिल्याने आयुक्तांनी संताप व्यक्त केला आहे.