वाकड (भूमकर चौक) अर्धा तास धो-धो बरसला!!
पिंपरी चिंचवड मधील काही भागात आज संध्याकाळी पाचच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह धो-धो बरसलेल्या पावसाने पाऊण तास पिंपरी चिंचवडला झोडपले. येथील भूमकर चौकातील भुयारी पुलात गुडघाभर पाणी साचले आहे. त्यात अनेक वाहने बंद पडली आहेत. या मार्गावर वाकड वाहतूक पोलिसांनी मार्गात बदल केल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत..