June 1, 2023
PC News24
कला

एच. ए. मैदानावर रंगणार शिवपुत्र संभाजी” महानाट्य …११ ते १६ मे दरम्यान प्रयोग

एच. ए. मैदानावर रंगणार शिवपुत्र संभाजी” महानाट्य …११ ते १६ मे दरम्यान प्रयोग

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “शिवपुत्र संभाजी” महानाट्याचा प्रयोग पिंपरीच्या एच. ए. मैदानावर दिनांक ११ ते १६ मे दरम्यान होणार आहे.

डॉ. अमोल कोल्हे अभिनित आणि महेंद्र महाडिक लिखित, दिग्दर्शित “शिवपुत्र संभाजी” या भव्यदिव्य बहुप्रतिक्षित महानाट्याचे आयोजन पिंपरी चिंचवड सायंकाळी ६:३० वाजता
हिंदुस्थान अँटिबायोटिक ग्राऊंड (एच.ए.) पिंपरी येथे होणार आहे,स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास भावी पिढीला समजावा आणि त्यातून प्रेरणा घेण्यासाठी हे महानाट्य नक्की पाहावे असे आवाहन डॉ. अमोल कोल्हे गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.या महानाट्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे स्वतः असून राजन बने बादशहा औरंगजेबाची भूमिका निभावणार आहेत. सोबतच महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत स्नेहलता वसईकर, अनाजीपंतांच्या भूमिकेत महेश कोकाटे, दिलेरखान आणि मुकर्रबखान अशा दुहेरी भूमिकेत विश्वजीत फडते कवि कलशांच्या भूमिकेत अजय तपकीरे आणि सरसेनापती हंबीररावांच्या भूमिकेत रमेश रोकडे अशा सिनेकलावंतांचा सहभाग या महानाट्यात आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांची प्रेक्षकांमधून चित्तथरारक घोडेस्वारी, तडाखेबाज संवाद, १२० फुटी रंगमंच ५५ फुटी तीन मजली किल्ल्याची प्रतिकृती, मराठे मोगल रणसंग्राम, २२ फुटी जहाजावरून जंजिर मोहीम, थेट प्रेक्षकांमधून जाणारी गनिमी काव्याची बुऱ्हाणपूर मोहीम, संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर सोबतच शहरातील स्थानिक कलाकारांना देखील या महानाट्यात काम करण्याची संधी देण्यात आली आहे.असे महानाट्याचे लेखक व दिग्दर्शक महेंद्र महाडिक यांनी सांगितले आहे.
तब्बल नऊ वर्षांनी हे महानाट्य पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडकरांच्या भेटीला आले असून शहरातील हिंदुस्थान अँटिबायोटिक ग्राऊंड – पिंपरी, रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह – चिंचवड, आचार्य अत्रे रंगमंदिर – संत तुकाराम नगर, पिंपरी, निळूभाऊ फुले नाट्यगृह – नवी सांगवी, बालगंधर्व रंगमंदिर – पुणे, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह – कोथरूड येथे तिकीट विक्री सुरू असून बुक माय शो वर ऑनलाईन तिकीट बुक करता येऊ शकते. तिकीट विक्रीस भरघोस प्रतिसाद मिळत असून शाळा व महाविद्यालयातून देखील हे महानाट्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे ग्रुप बुकिंग होत आहे.

Related posts

Netflix पासवर्ड शेअर करताय ? आता मोजावे लागतील जास्तीचे पैसे.

pcnews24

‘थिएटर वर्कशॉप कंपनी’संस्थेत रंगणार प्रायोगिक नाट्यकलांचा महोत्सव’

pcnews24

गौतमी ताई महाराष्ट्राचे बिहार करू नका !!

pcnews24

‘रत्नागिरीत पुन्हा प्रयोग करणार नाही’ अभिनेता भरत जाधव

pcnews24

एका फोन कॉलनं बदललं आयुष्य,अभिनेत्रीला मिळाली नवी संधी

pcnews24

द केरळ स्टोरी’ 200 कोटीच्या क्लबमध्ये

pcnews24

Leave a Comment