सोन्याच्या दरात मोठी वाढ
सोन्याच्या दरात गेल्या 3 दिवसांत जवळपास 1700 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे भाव 62 हजारांच्या पार गेलेत. मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे प्रती 10 ग्रॅमसाठीचे भाव 62400 रुपये झालेत. तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 57200 रुपये झाले आहेत. दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. चांदी 1150 रुपयांनी महागली आहे. मुंबईत आज चांदीचे दर 78250 रुपये किलो आहे. दरम्यान चांदी चार दिवसात 2200 रुपयांनी महाग झाली.