मध्य प्रदेशात गोळीबारात 6 जण ठार
मध्य प्रदेशामध्ये जमिनीच्या वादातून 2 गटात भयंकर वाद झाला. या वादादरम्यान एका गटाने तुफान गोळीबार केला. या गोळीबारात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला. ही घटना मोरोनातील सिहौनियामधील लेपा गावात घडली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.