दुबईच्या नोकरी आमिषाने 70 हजाराची फसवणूक
दुबई येथे नोकरी लावून देतो असे अमिष दाखवून 70 हजार रुपये घेत नोकरी न लावता फसवणूक केली.
याप्रकरणी प्रतीक अमृत चव्हाण (वय 33, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विशेष बाब अशी की हा सर्व प्रकार १ जून 2022 ते ४ मे2023 या कालावधीत वाकड परिसरात घडला आहे.
त्यानुसार अनिल दरेकर, देविदास सुखदेव जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल दरेकर याने फिर्यादी यांना शारजा दुबई येथे नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. (Wakad) त्यासाठी फिर्यादी प्रतीक अमृत चव्हाण कडून वेळोवेळी 70 हजार रुपये घेतले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना खोटा व्हिसा आणि इन्शुरन्स पाठवून त्यांना नोकरी न देता फसवणूक केली. वाकड पोलीस आधिक तपास करीत आहेत.