December 11, 2023
PC News24
धर्मसामाजिक

ॲड.प्रकाश आंबेडकर यांची ८ मे रोजी पिंपरी येथे जाहीर सभा

ॲड.प्रकाश आंबेडकर यांची ८ मे रोजी पिंपरी येथे जाहीर सभा

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश आंबेडकर यांची सोमवार, दि.८ मे रोजी सायं.६ वा. भव्य जाहीर होणार आहे.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील भीमसृष्टी येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेला संपूर्ण महाराष्ट्रातून वडार समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

वर्षानुवर्ष वडार समाजाच्या विविध मागण्या दुर्लक्षित आहेत. या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या मागण्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये वडार समाजाला मोफत शिक्षण, शासकीय नोकऱ्यांमध्ये स्वतंत्र
आरक्षण,जाचक अटीविना जातीचे दाखले मिळावे, क्रिमिलिअरची अट रद्द करावी, वडार समाज जेथे राहतो त्या जागा त्यांच्या नावावर करणे, वडार समाजाला गुन्हेगारी जात म्हणुन सरकारी नोंदीत असलेला ठपका काढून टाकावा, वडार समाजातील युवकांना
उद्योगधंद्यासाठी बिनव्याजी कर्ज देण्यात यावे या व अशा अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधण्या साठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी महाराष्ट्रातील वडार समाजातील समाजबांधवांनी व
बहुजन समाजाने या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सभेचे मुख्य संयोजक व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी केले आहे.

Related posts

पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघ कार्यकारिणी 2023 ते 2024 ची निवड जाहीर,अध्यक्षपदी दादाराव आढाव.

pcnews24

रायगडावर पोलिसांचा लाठीचार्ज

pcnews24

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी वर्गणीबाबत दिल्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना सूचना

pcnews24

क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी 41 कोटींचा निधी : मुख्यमंत्री

pcnews24

ब्रेकिंग न्यूज -मराठा आरक्षणासाठी युवकाने घेतले विष.

pcnews24

मणिपूर:दंगलग्रस्तांचे सांत्वन करण्यासाठी राहुल छावण्यांना गांधींची भेट

pcnews24

Leave a Comment