कंटेनर चालक कामगाराने स्वतःच्याच ऑफिसमध्ये केली चोरी
एका ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करणाऱ्या कंटेनर चालक कामगाराने स्वतःच्याच ऑफिसच्या ड्रॉवर मधून 83 हजार 550 रुपयांची रक्कम चोरली असल्याची घटना तळेगाव एमआयडीसी परिसरात घडली आहे.
बब्बू विश्वकर्मा(मूळ.रा नवलाख उंबरे.ता.मावळ) याच्या विरोधात गोरख जयवंत पडवळ यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पडवळ यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांच्या ट्रान्सपोर्ट मध्ये विश्वकर्मा हा कंटेनर चालक म्हणून काम करतो.
फिर्यादी पडवळ यांच्या ऑफिस मधील ड्रॉवर मधून विश्वकर्मा याने 83 हजार 550 रुपयांची रक्कम चोरून नेली. याबाबतचा अधिक तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.