June 9, 2023
PC News24
गुन्हा

पिंपरी-चिंचवड आयुक्तांचा ट्विटर द्वारे नागरिकांशी संवाद,95296 91966 वर what’s app द्वारे संपूर्ण करण्याचे आवाहन.

पिंपरी-चिंचवड आयुक्तांचा ट्विटर द्वारे नागरिकांशी संवाद,95296 91966 वर what’s app द्वारे संपूर्ण करण्याचे आवाहन.

पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था, गुन्हेगारी पोलीस ठाणे, आणि पोलीस चौक्यांचे बळकटीकरण, प्रतिबंधात्मक कारवाया, आणि अन्य विविध विषयांवर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे यांनी ट्विटर द्वारे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांची (दि.५मे सायंकाळी) संवाद साधला. नागरिकांनी ट्विटर द्वारे विविध प्रश्न उपस्थित केले काहींनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले तर काहींनी पोलीस व्यवस्था सुधारण्याची गरज असल्याचे ट्विट केले.
पिंपरी चिंचवड शहराला आयआयटीची पार्श्वभूमी असलेले पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे मिळाले आहेत.
शहरातील पोलिसिंगच्या बाबतीत काही बदल करणे गरजेचे असल्याचे प्रतीक कारंजे यांनी ट्विट केले.त्यावर आयुक्तांनी आपल्या तांत्रिक ज्ञानाचा वापर औद्योगिक वसाहती आणि आयटी नगरी असलेल्या शहरासाठी होईल, अशी आशा व्यक्त केली.शहरातील वाढत्या कोयता गॅंग आणि गुंडगिरी करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी विशाल दवणे यांनी केली. त्यावर पोलिसांनी आयुक्तांनी याबाबतचे थेट आकडे सादर करत सांगितले कि, (Chinchwad) मागील चार महिन्यात एकूण 59 शस्त्रे व 276 कोयते जप्त करण्यात आले आहेत. तसेच 135 कुख्यात गुंडांवर मोक्का व एमपीडीए अंतर्गत करवाई करण्यात आली आहे. भविष्यात अशीच कडक कारवाई चालू राहील.
बुलेटचे फटाके फोडत जाणाऱ्यांवर कारवाई करा. विशेषतः जे रात्री 10 नंतर फोडतात. त्यांना तर चांगलाच प्रसाद द्या, असे एन के यांनी  ट्विट केले त्यावर आयुक्त म्हणाले, “कारवाई जोरात चालू आहे. प्रसाद नाही पण चलन दिले जात आहे. या वर्षी 350 पेक्षा अधिक जणांवर कारवाई करुन सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत.”
संदीप भामरे यांनी बॅचलर शेजाऱ्यांचा त्रास होत असेल तर कायद्यात काही तरतूद आहे का, असे विचारले. त्यावर आयुक्तांनी केवळ 112 क्रमांकवर संपर्क करण्याची विनंती केली.

निलेश बोराटे यांनी दोन पानांवर प्रश्न टाईप करून ते पोलीस आयुक्तांना ट्विट केले. त्यात शहरातील पोलिसिंगशी संबंधित एकही प्रश्न नव्हता. ताऱ्यांची निर्मिती कशी होते. डोंगरावर उगवणाऱ्या गवताचे आयुष्य किती असते, अशा प्रकारचे प्रश्न होते.  तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न नासा, एलन मस्क अथवा चॅट जीपीटी कडे विचारण्याचा सल्ला पोलीस आयुक्तांनी दिला.

वाहतुकीचे प्रश्न सोडविण्यासाठी हिंजवडी वाहतूक विभाग पूर्णतः अपयशी ठरला असल्याची तक्रार राकेश यांनी केली. त्यावर हिंजवडी परिसरात अनेक संस्था संयुक्तपणे काम करत आहेत. त्यांच्या सोबत पोलीस देखील सर्वसमावेशकपणे काम करत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.(Chinchwad) त्याचबरोबर योगेश जोशी यांनी हिंजवडी आयटी पार्क मध्ये पीक अवर्स मध्ये अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्याचा सल्ला दिला. या सल्ल्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी वाहतूक विभागाला दिल्या आहेत.
विदेशातील पोलिसांकडून कोणती गोष्ट शिकून ती शहरात लागू करण्यासारखी आहे, असा प्रश्न अमित आवारे यांनी उपस्थित केला. या प्रश्नाचे आयुक्तांनी कौतुक केले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी उत्तर देताना म्हटले कि, मी नेदरलँड येथील भारतीय दूतावासात काम करत असताना तिथे होणारा तंत्रज्ञानाचा वापर अतिशय प्रभावी वाटला. तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे पिंपरी चिंचवड शहरात करण्याचा मानस आहे.”
या संवादात एका पठ्ठ्याने तर असंबंद्ध प्रश्नांची भलीमोठी यादीच पोस्ट केली. त्यावर आयुक्तांनी देखील “त्याचं उत्तर एलन मस्कला विचार” असा सल्ला दिला.
प्रतीक नाईक यांनी प्रत्येक आठवड्याला नागरिकांशी संवाद साधण्याची विनंती केली. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या कल्पना आणि प्रश्न पोलिसांपुढे मांडता येतील, असे नाईक यांनी म्हटले. त्यावर पोलीस आयुक्तांनी त्यांच्या ट्विटर आणि पिंपरी-चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाशी या संपर्क क्रमांका द्वारे  95296 91966 what’s app ने साधण्याचे आवाहन केले

Related posts

आणि जावयाने पाडले सासूचे 2 दात,काय घडलाय नक्की प्रकार?

pcnews24

पुण्यात वाढते आहे कोयत्यांची दहशत

pcnews24

दूर्दैवी प्रकार ,मुलानेच बापाला ट्रॅक्टरखाली चिरडले.

pcnews24

महिलेशी मोबाईलवर अश्लील वर्तन, पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल,आयपीएस अधिकारी…

pcnews24

अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याचे आदेश.. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची ३७ होर्डिंगवर कारवाई.

pcnews24

तरुणीची भीमा नदी पात्रात उडी मारून आत्महत्या

pcnews24

Leave a Comment