‘जम्मू-काश्मीर भारताचा भाग होता, आहे व राहील’
गोव्यातील SCO शिखर परिषदेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जम्मू-काश्मीरबाबत मोठे विधान केले. ‘जम्मू-काश्मीर भारताचा भाग होता, आहे व राहील. कलम 370 हा आता इतिहास झाला आहे. हे जितक्या लवकर लोकांना समजेल तितके चांगले,’ असे ते म्हटले. यापूर्वी बिलावल भुट्टोंनी माध्यमांशी बोलताना काश्मीरमधील पूर्वीची परिस्थिती जोपर्यंत पूर्ववत होत नाही तोपर्यंत भारताशी संबंध सामान्य होऊ शकत नाहीत, असे म्हटले होते.