मनसेच्या उपशाखाप्रमुखाचा मृत्यू
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज रत्नागिरीत मोठी सभा होणार आहे. त्याआधीच एक मोठी दुर्घटना घडली. राज ठाकरे यांच्या सभेसाठी निघालेल्या मनसैनिकांच्या गाडीला रत्नागिरीजवळ अपघात झाला आहे. या अपघातात मनसेचे दहिसर विभागाचे उप शाखाप्रमुख देवा साळवी यांचे निधन झाले आहे. या अपघातात इतर मनसे सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे