महिलेशी मोबाईलवर अश्लील वर्तन, पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल,आयपीएस अधिकारी निलेश अशोक अष्टेकर रा.आंबेगाव बुद्रूक, पुणे, यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कळवा ठाणे येथील ३१ वर्षीय विधवा महिलेशी फेसबुकवर ओळख वाढवून अष्टेकर यांनी महिलेची सर्व वैयक्तिक कुटुंबाची माहिती
विचारली. पोलिस भरती सुरू असून नोकरीस लावण्याचे आश्वासन देवुन त्यांनी महिलेशी प्रथम बोलण्यास व नंतर त्यांच्याशी जवळीक साधण्यास सुरूवात केली. तसेच व्हॉट्सअप मेसेजेस, व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बऱ्याच वेळा महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केली. मोबाईलवर अश्लील फोटो आणि मेसेजस पाठविण्यास सुरूवात केली. तसेच त्यांनी एके दिवशी व्हाट्सअप कॉल केला त्यावेळी ते स्वतः नग्न होते व त्यांनी महिलेला नग्न होण्याची मागणी केली.
या विधवा महिलेकडे त्यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचे देखील फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे. पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.