आदित्य बिर्ला ते डांगे चौकापर्यंतच्या रस्त्याचे नुतनीकरण, अभिप्राय पाठवण्याचे आवाहन
पिंपरी चिंचवड : शहरातील रस्त्याचे सकारात्मक नियोजन करुन नजिकच्या काळामध्ये सार्वजनिक वाहतूक, मोटार विरहित वाहतुक व सर्वसमावेशक पायाभूत सुविधा उभारण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे. आदित्य बिर्ला रस्ता हा शहरातील मुख्य रस्त्यापैकी एक रस्ता आहे. या रस्त्यावरील डांगे चौकापर्यंत अद्ययावत पद्धतीने पूर्ण रुंदीने विकसित करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार सदर रस्त्याचे सलग पादचारी मार्ग, सलग सायकल मार्ग, आवश्यक त्या ठिकाणी सेवा रस्ता व Recreational Area तयार करणे या संकल्पनेआधारे रस्त्याचे विकसन करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
आदित्य बिर्ला रस्त्यावरील डांगे चौकापर्यंत रस्त्याचे नुतनीकरण करण्याचे महानगरपालिकेने नियोजन केले असून त्यामध्ये नागरिकांच्या सूचनांचा अंतर्भाव करून पूर्ण रस्त्याचे डिझाईन अंतिम करावयाचा महानगरपालिकेचा मानस आहे. त्याकरीता सद्यस्थितीतील सेवा रस्ता, पादचारी मार्ग, सायकल चालविणेस सुरक्षित असा नियोजित रस्ता याचे सादरीकरण महानगरपालिकेच्या Website व स्मार्ट सिटी Website App येथे पाहण्यास उपलब्ध करून देणार आहोत.
तरी, नागरिकांनी याबाबत त्यांचे अभिप्राय: मनपाच्या संकेतस्थळhttp://www.pcmcindia.gov.in सारथी अॅप, स्मार्टसिटी संकेतस्थळ icivil@pcmcindia.gov.in यावर २०.५.२३ पर्यंत द्यावेत.