श्री गुरुदेव दत्त
आज रविवार दिनांक 7 मे 2023
मिती वैशाख मासे कृष्ण पक्षे 2 शालिवाहन शके 1945 शोभन नाम सवंत्सरे
दिन विशेष उत्तम दिवस
या सप्ताहात ग्रहमान
रवि बुध गुरु राहू हर्षल – मेष राशीत
चंद्र वृश्चिक धनु मकर कुंभ राशींतून भ्रमण
शुक्र मिथुनेत मंगळ मिथुनेत /कर्क केतू तुळेत शनी कुंभेत या सर्व ग्रहांचा विचार करून आपण साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ या
मेष रास
रविवार सोमवार अपमानाचे प्रसंग येतील मंगळवार ते शुक्रवार सर्व मनासारखे होईल शनिवार लाभदायक जाईल डाव्या पायाला जपा
वृषभ रास
रविवार सोमवार कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल मंगळवार पीडादायी आहे किरकोळ आजाराकडे लक्ष देऊ नका बुधवार गुरुवार शुक्रवारी बाहेरील दौरा राहील शनिवार उत्तम दिवस आहे
मिथुन रास
रविवार सोमवार मजेत जातील मंगळवार बुधवार जोडीदाराची साथीमुळे बऱ्याच गोष्टी चुटकी सरशी सुटतील गुरुवार शुक्रवार सकाळी मनाप्रमाणे न झाल्यामुळे चिडचिड होईल
कर्क रास
रविवार सोमवारी मुलांच्या प्रगतीमुळे खूप समाधान वाटेल स्पर्धा परीक्षेत यश मिळेल जोडीदाराशी वाद बुधवारी व शनिवारी होतील मंगळवारी बाहेरगावी जाल
सिंह रास
रविवार सोमवार मनासारखे दिवस राहतील मंगळवार बुधवार व्यक्तीमत्व बहारदार राहील तरुणांना उत्तम नोकरी मिळेल तरुण तरुणीचे विवाह जुळतील
कन्या रास
या आठवड्यात रविवारी सोमवार त्रासदायक राहतील वाहनांची काळजी घ्या प्रवास बुधवार गुरुवारी लाभदायक ठरेल
तूळ रास
11 मे नंतरचा मंगळ बदल आपणास नोकरी व्यवसायात खूप चांगला बदल घडवून येईल सोमवारी कसकस जाणवेल शुक्रवार शनिवार लाभदायक
वृश्चिक रास
रविवार सोमवार मनोच्छित राहतील मंगळवार बुधवारी खर्च जपून करा 10मे नंतर बदलणारा मंगळ आरोग्य उत्तम ठेवल शुक्रवारी शनिवारी पाहुण्याची वर्दळ राहील
धनु रास
रविवारी स्वतः ची काळजी घ्या मंगळवार बुधवारी जे ठरवाल ते होईल गुरुवार शुक्रवार लाभदायक मंगळ अनिष्ट आहे जमिनीचे व्यवहार दोन महिने पुढे ढकला
मकर रास
रविवार सोमवार उत्तम राहतील मंगळवार बुधवार प्रवास टाळा मौल्यवान वस्तू जपा
गुरुवार ते शनिवार धावपळीचे राहतील
कुंभ रास
बुधवार पर्यंत उत्तम दिवस आहेत 11 पासून आपल्या हित शत्रूपासून धोका संभावतो विवाहच्छुचे विवाह
जमतील
मीन रास
हा सप्ताह आपणासाठी सर्व मनोरथ पूर्ण करणारा राहील शुक्रवार शनिवारी स्वतःची काळजी घ्या
श्री शरद कुलकर्णी (ज्योतिष अलंकार)
चिंचवड पुणे 9689743507